vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकनेते रामदास आठवलेंचा वाढदिवस साजरा

 लोकनेते रामदास आठवलेंचा वाढदिवस साजरा

[: सुरेश गायकवाड

: मुंबई प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस केंद्रीय कार्यालयात नुकताच साजरा करण्यात आला. हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबईचे अध्यक्ष व रिपलिकन म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळेस दक्षिण मध्य मुबईचे अध्यक्ष शिरिष चिखलकर ,कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, लोकशाहिर अशोक कांबळे, कार्यालयीन सचिव दादासाहेब जाधव , हे ही उपस्थित होते.

: ह्या दिवशी लोकशाहिर अशोक कांबळे यांनी रामदास आठवले यांच्या जाती तोडो ‘ भारत जोडो संदेशाची आठवणी पर गाणे गाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

: त्यावेळेस प्रकाश जाधव म्हणाले कि, आठवले साहेब, आपला वाढदिवस साजरा करावा म्हणून अलिप्त राहतात. ते कुणाही कडून कसल्याही प्रकारची गुरुदक्षिणा वा कसली भेट स्विकारीत नाही. याउलट दीनदुबळ्या ची सेवा करावी . त्यांचा आधारवड व्हाव. त्यांची काठी व्हावी असाच त्यांचा जीवन प्रवास राहिलेल ‘आहे. त्यामुळे वडाळा हॉस्टेलचा सुरु झालेला प्रवास ते आता पर्यंतचा मंत्रीपदाचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. कारण त्यांच्या आईने तु बाबासाहेबांसारखा मोठा हो’ अशी साद घातली होती ती त्यांनी पूर्ण केली. असा हया संघर्ष नायक चा प्रवास आहे ज्यांनी ज्यांनी अठराविश्दारिद्रये पाहिली परंतु ते जाणीव विसरले नाहीत . अशा संघर्ष नायकाचा’ संघर्ष दिन’ म्हणून हा वाढदिवस साजरा करताना त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

त्यावेळेस रिपल्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते ‘ पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पोलिसांची कारवाई सुरु, मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; भोंग्यासह, लाऊडस्पिकर मशीन घेतली ताब्यात….

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) च्या वतीने बैठकीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४=विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

vishwatmaklokswamivarta

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

मुंबई मध्ये वरळी सी लिंक भागात एका मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळला आहे

आपत्ती व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी शनिवारी मॅरेथॉन