vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन· पुस्तके पाठविण्याचा कालावधी 31 जानेवारी 2024 पर्यंत..

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन· पुस्तके पाठविण्याचा कालावधी 31 जानेवारी 2024 पर्यंत..

 

जालना, प्रतिनिधी :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार देण्यात येत असतो. तरी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपले साहित्य दि. 1 ते 31 जानेवारी 2024 या विहीत कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

 

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२३ Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2024 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर/ पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2024 हा राहील. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. असे तहसीलदार(सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.836

संबंधित पोस्ट

आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार

नव्या मुंबईतील तळोजा येथील धक्कादायक घटनेने रायगड हादलले आहे. तळोजा पोलीस हद्दीत येणाऱ्या एका इमारतीत अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

गुरुवारी(दि.6)जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

एड्स जनजागृतीसाठी बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

सौर ऊर्जा प्रकल्पाला मिळालेली मंजुरी हे आपल्या पाठपुराव्याचे यश – कैलास गोरंटया ल—-आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा विद्यमान आमदारांचा प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

धक्कादायक! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्यास थांबवल म्हणुन बीएसएफ जवानाची हत्या…

vishwatmaklokswamivarta