vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एड्स जनजागृतीसाठी बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

 एड्स जनजागृतीसाठी बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवकांमध्ये एचआयव्ही/एड्स विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अलिबाग येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा कमानी परिसरातून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबागमार्फत करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रवीण कंदाडे, एचओडी पीसीएम नाझिया, एचओडी एसएमटी डॉ. साक्षी पाटील, दालसा मुख्य ऍड. सी. सी. कामथे, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टिनियलच्या अध्यक्षा निहा घरत, ॲड. निहा राऊत, ॲड. अंकित बंगेरा आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅलीदरम्यान “अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ”, “वचन पाळा, एड्स टाळा”, “स्त्री शक्तीचा एकच नारा—एचआयव्ही/एड्स हद्दपार करा” अशा घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक कॉलेज व नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. महावीर चौक – शिवाजी पुतळा – बालाजी नाका – मारूती रोड मार्गे रॅली पुन्हा समुद्रकिनारी दाखल झाली.

आयसीटीसी इंटेंसिफाइड आयईसी कॅम्पेनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक: उपजिल्हा रुग्णालय रोहा – समुपदेशक महेश गोसावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगेश पाटील, द्वितीय क्रमांक: उपजिल्हा रुग्णालय माणगाव – समुपदेशक प्रिया निवाते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरती राजपूत.

तृतीय क्रमांक: जिल्हा रुग्णालय अलिबाग आयसीटीसी 01 – समुपदेशक अर्चना जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता तुळपुळे, डीएसआरसी समुपदेशक सौ. अश्विनी कदम, मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, वाहनचालक अतिश नाईक, क्लिनर रुपेश पाटील यांना विशेष कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. लोकपरिषद पनवेल, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण, आधार ट्रस्ट पनवेल या स्वयंसेवी संस्थांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. इंडेक्स टेस्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल रिलायन्स हॉस्पिटल, लोधिवलीचा गौरव करण्यात आला.

रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी, हेमकांत सोनार, आयसीटीसी समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग ऑफिसर व एनजीओ प्रतिनिधींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सहाय्यक एम अँड ई सौ. रश्मी सुंकले यांनी केले.

संबंधित पोस्ट

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण,नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा

सर्व विभागांनी समन्वयाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई

vishwatmaklokswamivarta

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे इंदू मिल येथील स्मारकाची पाहणी…