vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन

जालना प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील पोलिस पाटील पद भरती-2025 साठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुकांनी आपले अर्ज https://jalnapp.recruitonline.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यास दि.15 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि.30 सप्टेंबर 2025 अशी आहे. पोलिस पाटील पदासाठी खुला प्रवर्ग 800 तर मागास प्रवर्गासाठी 600 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. लेखी परीक्षा दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण, संबंधित गावचा रहिवासी, वय 25 ते 45 दरम्यान असावे. तसेच जाहिरातीनूसार इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. पोलिस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात https://jalnapp.recruitonline.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उ मेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

धारावीत भारतीय जनता पार्टी चे लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क* *नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

vishwatmaklokswamivarta

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर