vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्नजिल्ह्यातील विकासाची कामे तात्काळ पार पाडावी – खासदार डॉ.कल्याण काळे

दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्नजिल्ह्यातील विकासाची कामे तात्काळ पार पाडावी – खासदार डॉ.कल्याण काळे

जालना द प्रतिनिधी- जल जीवन मिशन, महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांसह विविध योजनेंतर्गंत मंजूर असलेली लोकहिताची विकास कामे वेळेत पार पाडावीत, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दिल्या.   जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज आयोजित जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच ‘दिशा’ समितीच्या आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. काळे बोलत होते. बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम., अपर जिल्हाधिकारी रिता मैवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिल पठारे, यांच्यासह समिती सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.

लोकहिताची विकास कामे करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामासह इतरही कामे तातडीने सुरु करुन वेळेत पुर्ण करावीत. ग्रामीण रस्ते हे गावातील गावकरी व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे रस्ते असून त्यांच्यासाठी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार डॉ.काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.   जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील कामामध्ये बराच कालावधी उलटल्यानंतरही कोणतीच प्रगती झाली नसून, या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबद्दल खासदार डॉ.काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच या योजनेतंर्गत काही गावात झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरातील व ग्रामीण भागातील दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या फरकाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्वयं सहायता गट स्थापन झालेल्या बचतगटांना बँकांकडून निधी मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. अशी सुचनाही खासदार डॉ.काळे यांनी केली.

बैठकीत समितीचे अध्यक्ष डॉ.काळे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना,राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मध्यान्ह भोजन योजना, संजय गांधी निराधार योजना, डिजीटल भारत, सर्व शिक्षा अभियान, जल जीवन मिशन, उमेद, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, महावितरण, स्वामित्व हक्क, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध लाभाच्या योजना आदी योजनांचाही यावेळी आढावा घेतला. जालना महानगर पालिकेच्या हद्दीतील प्रॉपर्टी कार्डच्या कामासह इतर कामांबाबतही दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ काळे यांनी विविध सुचना केल्या

  केंद्रीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिशा समिती काम करत असते. यात एकूण 22 विषय समाविष्ट आहेत. केंद्राच्या विविध योजना तालुकास्तरावर प्रलंबित न ठेवणे तसेच विकास कामात दिरंगाई झाल्यास तपासणी करणे आदी कामे दिशा समितीकडून करण्यात येत असते. तसेच जिल्ह्यातील बेघर असणाऱ्या गरजु लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

   केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतील कामे, लाभार्थ्यांची संख्या जाणून घेत उपस्थित लोकप्रतिनिधी व सदस्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी बैठकीला संबंधित उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी किशन जावळे

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

vishwatmaklokswamivarta

भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा यात्रा