vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव *२९ व ३० सप्टेंबर रोजी मराठी चित्रपटगीतांची सुरेल मैफल; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य* 

कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव *२९ व ३० सप्टेंबर रोजी मराठी चित्रपटगीतांची सुरेल मैफल; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य*

कोल्हापूर, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि अविस्मरणीय चित्रपटगीतांचा रसिकांना अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर आणि बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज परिसर, राजारामपुरी, कोल्हापूर येथे हा महोत्सव होणार आहे.

दोन दिवसांच्या या महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कालखंडातील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली भावविश्वे, संगीतपरंपरा आणि गीत-संगीताचा समृद्ध वारसा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपटसंगीताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी गीते, त्यातील भावस्पर्शी आशय आणि संगीताची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटगीतांच्या समृद्ध वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच विविध कलाप्रकार आणि संगीतपरंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या महोत्सवातील दोन्ही दिवसांचे कार्यक्रम प्रवेश विनामूल्य असून कोल्हापूर व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘मराठी चित्रपटगीत महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

निर्माते दिग्दर्शक अमित जानी यांचा “काला हिरण: द बैटल फॉर लिगेसी’ या आगामी चित्रपटामुळे बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिल्ली हायकोर्टातून मोठा झटका

दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या स्मृतिदिन उत्साहात साजरा 

हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष ! मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून आढावा राजधानीत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी