vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संस्कार प्रबोधिनीचा उपक्रम:- विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाचेधडे बांबू शेती शेतकर्‍यांना वरदान- डॉ.सुयोग कुलकर्णी

संस्कार प्रबोधिनीचा उपक्रम:- विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाचेधडे बांबू शेती शेतकर्‍यांना वरदान- डॉ.सुयोग कुलकर्णी

 

जालना, (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना विज्ञान,भूगोल या शाळेतील विषयानुसार संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांनाप्रत्यक्ष विज्ञान आणि भूगोल याविषयी माहिती देण्यासाठी क्षेत्रभेटीचाउपक्रम सुरू केला. त्या अनुषंगाने डॉ.सुयोग कुलकर्णी यांच्या शेतावर

इयत्ता दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेती व व्यवसायाची

माहिती घेतली.

यामध्ये बांबू शेती,सिताफळ, जांब,गोपालन या संदर्भात प्रगतशील शेतकरी

डॉ.सुयोग कुलकर्णी यांनी सांगितले की बांबू शेती शेतकर्‍यांसाठी वरदान

आहे.कारण बांबू या पिकाला पाणी कमी लागते. आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणावर

मिळते.यात आंतरपीक घेऊन शेतकरी दुहेरी नफा मिळू शकतो, म्हणून बांबू शेती

शेतकर्‍यांसाठी वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. बांबूच्या अनेकवस्तू

तयार होत आहेत. यात पेन, डायरी,कपडे आणि इथेनॉल यासाठीही बांबूचा उपयोग

केला जातो,तसेच मोठ्या प्रमाणात मनुष्याला प्राणवायू बांबू देतो,व्यवसाय

म्हणून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली पाहिजे. या क्षेत्रभेटीचे

आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी, सहशिक्षिका शारदा उगले दहिभाते

यांनी केले होते.

विद्यार्थ्यांनी ४० एकरचा परिसर बघून विद्यार्थी भारावले होते.या

उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख,प्रा.राम

भाले, विनायकराव देशपांडे,प्रा. केशरसिंह बगेरीया मु.अ.ईश्वर वाघ शिक्षक

शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी कौतुक केले आहे.दरम्यान विद्यार्थ्यांना

शिक्षणाबरोबरच शेती व्यवसायाचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्यक्ष

शेती आणि तेथे लावलेल्या विविध पिकांची माहिती विद्यार्थ्यांना या

माध्यमातून घेता आली.

विद्यार्थी-विद्यार्थिंनी शेती बघून भारावले….

क्षेत्रभेटीच्या माध्यमातून शेती शेतीत इतके पिके घेतात हे पहिल्यांदाच

माहीत झाले. यामुळे मला शेतीची माहिती झाले असून आम्ही शेती बघून भारावलो

असल्याचे विद्यार्थिनी मयुरी राम भालेराव हिने सांगितले तर विद्यार्थिनी

पुर्वी कदम म्हणाली की, गोपालन आणि बांबू शेती,शेतीची माहिती मला

मिळाल्याचे सांगितले.

००००००००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमच्या संघटनेचे मत.

लोकसभा निवडणूक २०२४ संवाद,समन्वय आणि सहकार्य आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरघर तिरंगा’स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार  

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -:तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची ज्येष्ठ नागरिकांची इच्छाशासन करणार पूर्ण