मुंबईतील बांद्रा पूर्व येथे अरुणोदय वॉकर्स असोशियन तर्फे 28 वी वार्षिक चालण्याची स्पर्धा संपन्न..
मुंबई प्रतिनिधी मुंबईतील बांद्रा पूर्व येथे असणाऱ्या वरिष्ठ नागरिकांसाठी काम करणारी सामाजिक संस्था अरुणोदय वॉकर्स असोशियन यांनी 28 वी वार्षिक चालण्याची स्पर्धा वयोगट 40 ते 80 महिला पुरुष व वृद्धांकरिता आयोजित करण्यात आली होती
अरुणोदय वॉकर्स असोशियन यांनी 28 वी वार्षिक चालण्याची स्पर्धा वयोगट 40 ते 80 महिला पुरुष व वरिष्ठ नागरिकांसाठी वृद्धांकरिता आयोजित करण्यात आली होती रविवार आज 7 जानेवारी 2024 सकाळी साडेसहा ते साडेनऊ स्थळ एमआयजी ग्राउंड बांद्रा येथे नुकतीच उत्साहात पार पडली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम आय जी चे सचिव श्रीकांत शेट्टी रोटरी क्लबचे राज सेठ एन के जी एस बँकेच्या संचालिका जानवी पै सहकार भांडार चे विजया अध्याय सचिव किरण भोगले सल्लागार निळकंठेश्वर दादा अंजली रिस्बूड मान्यवर उपस्थित होते यांच्या हस्ते प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या एकूण बारा स्पर्धकांना रोख रक्कम शील्ड व फुलगुच्छ देण्यात आली. पुरुष गट 12 महिला गट 12 एकूण चोवीस अधिक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली
यावेळी सूत्रसंचालन एडवोकेट शेषाद्री आभार वसुंधरा देशपांडे यांनी मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी भारती पोळ शिल्पा सोमानी दिलीप गाडेकर मोहन साळवी इराणी मॅडम व इतर सहयोगी अरुणोदय सदस्यांनी परिश्रम घेऊन योगदान केल्याबाबत अरुणोदय वाकर्स असोशियन यांचे सचिव दिलीप गाडेकर आभार आभार व्यक्त केले