vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धनगर समाजाच्या हक्कासाठी निर्णायक टप्पा – अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन!- प्रमोद वाघमोडे

धनगर समाजाच्या हक्कासाठी निर्णायक टप्पा – अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन!- प्रमोद वाघमोडे

मुंबई / ठाणे(प्रतिनिधी) – धनगर समाजाचा सर्वांगीण विकास व शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले अनुसूचित जमातीचे (Scheduled Tribe) प्रमाणपत्र आजही समाजाला मिळालेले नाही. हा हक्क प्राप्त करण्यासाठी आता निर्णायक लढ्याची गरज असून, तो फक्त न्यायालयीन मार्गाने शक्य आहे, असे प्रतिपादन श्री. प्रमोद वाघमोडे, कोकण विभागीय सचिव, महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य यांनी केले.

त्यांनी स्पष्ट केले की, 1956 पूर्वी व नंतरही “Dhangad” नावाची कोणतीही जात अथवा जमात राज्यात अस्तित्वात नसल्याचे सरकार दरबारी व न्यायालयीन निर्णयांतून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे धनगर समाजाने आपला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयात सक्षमपणे उभं राहण्याची हीच योग्य वेळ आहे.

“आपण जर स्वस्थ बसलो, तर काहीही हातात येणार नाही. आता सर्व मतभेद, हेवेदावे बाजूला सारून एकवटण्याची वेळ आली आहे. अहिल्यादेवी मातेचे वंशज म्हणून आपल्याला संघर्षाची मशाल पुन्हा पेटवावी लागेल. रस्त्यावरचे आंदोलन आणि कायदेशीर लढाई या दोन्ही बाजूंनी आपण ताकदीने लढलो, तर शंभर टक्के यश निश्चित आहे,” असेही श्री. वाघमोडे यांनी ठामपणे सांगितले.

महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपापले व्यक्तिगत भेद विसरून, हक्काच्या या लढ्याकरिता एकत्र यावे. ही लढाई सामाजिक, कायदेशीर आणि वैचारिक पातळीवर एकजुटीने लढल्यास, आपले मूलभूत हक्क मिळवणे शक्य होईल.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरणशाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर केंद्राचे बळकटीकरण करा -उपमुख्यमंत्री

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत 

कारागृहातील कैद्यांनी चांगले व्यक्तिमत्त्व बनून जीवन जगावे  – कारागृह अधीक्षक विजय कांबळे,सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी “जीवनगाणे गातच जावे”

केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार गौरव पुरस्कार सोहळा-विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी’, आमदार विनय कोरे यांना ,’सहकार भूषण पुरस्कार,

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*