मुंबई- रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीच्या वतीने १३ व १४ जानेवारी २०२४ रोजी फिनिक्स टॉवर्सच्या शेजारी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथे सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.०० दरम्यान दोन दिवसीय फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याचे या संस्थेचे प्रकल्प प्रमुख मुरारी अग्रवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ह्या, मेडिकल कॅम्पमध्ये सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल, सेफी हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, कमलादेवी गोरीदत मित्तल आयुवेदिक हॉस्पिटल, कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि कैवल्य धाम हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर या शिबिरात रुग्णांची तपासणी करणार असल्याचे ही त्यांनी आर्वजून सांगितले.
: या, मेडिकल कॅम्पचा आतापर्यंत जवळ जवळ ३५०० हून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय लाभ झाला आहे. आणि आता हे १५ वे मेडिकल कॅम्पचे वर्षे असून ह्या कॅम्पमध्ये ही चार ते पाच हजार रुग्णांना मोफत वैद्यकीय लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगून या कॅम्पमध्ये डोळे, दात, अस्थमा, हाडे, साखर, कॅन्सर, ई.सी.जी, आयुर्वेद, , त्वचा, केस, जयपूर फूट, मधुमेह अशा विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले , पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थेचे पदाधिकारी अनुपमा जलान, अड विनय खंडेलवाल, जॉर्डन मॅकनेले उपस्थित होते.