vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी: मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस लोणावळ्यात 20 मिनिट रोखली; संतप्त नागरिक उतरले रुळावर

आताची मोठी बातमी: मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस लोणावळ्यात 20 मिनिट रोखली; संतप्त नागरिक उतरले रुळावर..

राज्य प्रतिनिधी

पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) स्थानिकांनी लोणावळा येथे रेल रोको आंदोलन  करण्यात आले. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस  स्थानिकांनी तब्बल 20 मिनिटे रोखून धरली होती

आंदाेलना प्रसंगी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात हाेता. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र तरी देखील स्थानिकांनी रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले

लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि वंदे भारत रेल्वे लोणावळा येथे थांबवण्यात यावी तसेच पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 यावेळेत हव्यात अशी प्रमुख मागणी असल्याचे स्थानिकांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढल्यानंतर डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

संबंधित पोस्ट

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातूनघरोघरी मतदान जनजागृती

मुलांनी फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी राहावे – न्यायाधीश सुनीता तिवारीकौटुंबिक न्यायालय रंगले… बालकांच्या किलबिलाटात…

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

vishwatmaklokswamivarta

उमेद अभियानामार्फत ‘खरेदीदार-विक्रेते’ यांचे संमेलन संपन्न महिला स्वयंसहायता समूहांनी शहरी बाजारपेठात आपली ओळख निर्माण करावी. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

vishwatmaklokswamivarta