vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाथषष्ठीनिमित्त सेवा भक्ती संगम**संत एकनाथांची लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी- डॉ.सविता मुळे*

*नाथषष्ठीनिमित्त सेवा भक्ती संगम**संत एकनाथांची लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी- डॉ.सविता मुळे*

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- संत एकनाथ महाराजांमध्ये एक लोकशिक्षक दडलेला होता. त्यांच्यातल्या लोकशिक्षकाने तत्वज्ञानाला रूपकाची जोड देऊन समाजाला सुधारण्याचं काम केलं. संत एकनाथांची हीच लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी, असे आवाहन संतसाहित्य अभ्यासक डॉ. सविता मुळे यांनी आज पैठण येथे केले.पैठण येथे आज तहसील कार्यालयात नाथषष्ठीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सेवा भक्तीसंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, गटशिक्षण अधिकारी मनोरमा चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे तसेच श्रीमती वर्षाताई भुमरे, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती करुणा स्वामी आदी मान्यवर हजर होते

डॉ. सविता मुळे यांनी आपल्या अभ्यासू विवेचनात मांडणी केली की, संतांचे अभंग गाऊन भक्ती करताना, त्या अभंगातले मूळ तत्व अंगीकारणे व आपल्या जीवनात त्याचा अंमल करणे हे महत्त्वाचे आहे. संत एकनाथांचा जीवन प्रवास आपल्या कीर्तनातून उलगडताना डॉ. मुळे म्हणाल्या की, नाथांनी भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत यासारखे ग्रंथ निर्माण केले. तसेच भारुडासारखे समाजजागृती करणारा अजोड साहित्य प्रकार समाजाला दिला. त्यांनी समाजातल्या वैगुण्यावर टीका करतानाच लोकांना जागृत करण्याची भूमिका घेतल

प्रशासनाने हीच भूमिका अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, प्रशासकीय सेवा करताना सेवा हेच हीच भक्ती हे तत्व घेऊन प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपले कार्य करावे. त्यातून त्यांच्या हातून सत्कर्म घडावे, अशी इच्छा व्यक्त केली.याप्रसंगी आ. विलास भुमरे प्रतिष्ठान, स्थानिक शिक्षक यांच्या वतीने बुक बँक उपक्रमासाठी पुस्तके दान देण्यात आली.दरम्यान आज पहाटे पैठण येथे नाथसमाधी मंदिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक पूजा केली.आ. विलास भुमरे, त्यांच्या पत्नी वर्षाताई भुमरे,अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अन्नामृत’ची करामत…४० हजार बालकांची रोज‘अंगत पंगत’

vishwatmaklokswamivarta

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो व चार्जिंग सुविधेसाठी बडनेरा येथे जमीन

विशेष लेख-उष्णतेच्या लाटेत अशी घ्या काळजी

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा २ लाख रुपये करणार – मंत्री अतुल सावे ️ भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta