vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर

 

मुंबई द प्रतिनिधी: महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध धोरणे आणि योजना प्रभावीपणे राबवत आहे. बचतगटांना प्रोत्साहन तसेच महिलांची सुरक्षा, कौशल्य प्रशिक्षण व सायबर साक्षरतेवर राज्य शासन भर देत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना केले.

महिला दिनानिमित्त विधानसभेत विशेष प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर विधानसभेतील महिला आमदारांबरोबरच पुरुष आमदारांनीही सहभाग घेऊन चर्चा केली.

महिला व बाल विकास विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व पुरुष लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे महिलांच्या समानतेसाठी प्रयत्न केल्यास समाजात सकारात्मक बदल अधिक वेगाने घडू शकतात.

महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिला आमदारांनी महिलांच्या विकासासंदर्भात विविध सूचना मांडल्या असून काही पुरुष आमदारांनीही या चर्चेत सहभाग घेतल्याचा आनंद असल्याचे सांगून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने केलेल्या उपक्रमांना सर्वांचे सहकार्य मिळाल्यास समाजात समानतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान,महाराष्ट्र ही संतांची आणि पुरोगामी विचारांची भूमी असल्याचे सांगताना मंत्री तटकरे यांनी महिलांच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला. राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, अहिल्याबाई होळकर यांनी उत्तम प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यलढ्यात पराक्रम गाजवला. स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. तसेच भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे योगदानही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बचतगटांसाठी ‘उमेद मॉल’ पायलट प्रकल्प,महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ‘उमेद मॉल’ हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला ११ जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता १३ जिल्ह्यांमध्ये विस्तारण्यात आला आहे. या मॉलमध्ये बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. हे मॉल तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्तावित ‘शक्ती कायदा’ संदर्भात केंद्र सरकारने काही कायद्यांमध्ये बदल केले असल्याने त्यानुसार राज्य शासन आवश्यक सुधारणा प्रस्तावित करून केंद्राकडे सादर करणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर लिंगनिदानाच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह आणि आरोग्य विभागासोबत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना यांना घरी चैत्र नवरात्री दरम्यान ‘कन्यारत्न’; शेअर केला चिमुकली सोबतचा पहिला फोटो..

राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे ही शासनाची भूमिका- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही

विशेष लेख :विधानसभा निवडणूक २०२४- टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज….

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी

पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद;२०० हून अधिक पत्रकार – कुटुंबीयांनी घेतला लाभ