vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दहिद बु. जिल्हा परिषद शाळेतराजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव

दहिद बु. जिल्हा परिषद शाळेतराजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव

 

बुलडाणा, प्रतिनिधी : दहिद बु. येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी आयएसओ उच्च प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव, युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती, तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

 

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद राजपूत अध्यक्षस्थानी होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष नीता जैन, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आत्माराम गायकवाड उपस्थित होते.

 

दहिद बु. येथील शाळा जिल्हाभरात ‘उपक्रमांची शाळा’ म्हणून परिचित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जाते. राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊची वेशभूषा धारण केली होती. मोहिनी जैन यांनी राजमातांचा जीवनपट सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर भाषणे सादर केली. ऋत्विका राजपूत हिने तलवार बाजीचे प्रदर्शन केले.

 

कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष राजूभाऊ राजपूत उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळेत माता-पालकांसाठी रांगोळी, तसेच घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. राजेंद्र गवई यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री जाधव यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी सुनंदा गायकवाड, आशा खेत्रे, कावेरी जाधव, पल्लवी खरात, गणेश मुळे, जितेंद्र पालकर यांनी यांनी पुढाकार घेतला.

 

00000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू ,उमेद्च्या वतीने जानकी वस्तूचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी  ना. खा. केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर