vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

 

जालना, (प्रतिनिधी)-जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली आहे.जालना शहरातील हनुमान घाट येथे स्व.बालचंद कन्हैयालाल भुरेवालद्वार या प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार कैलास गोरंट्याल व सर्वपक्षीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाालेकी, (माजी केंद्रीय रावसाहेब दानवे यांना उद्देशून)तुम्ही पराभूत झालात
तरी केंद्रात व राज्यात तुमची सत्ता आहे. जालना शहराचे अनेक प्रश्न जे शासन स्तरावर प्रलंबित आहेत शहरात ४० टक्के गोरगरीब हे शहरातील जवळपास ५० झोपडपट्ट्यात राहतात. त्या शासकीय जमिनीवर आहेत. शासनाच्या घरकुल योजना करिता निधी येऊनही या झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना या जागेचा मालकी हक्क नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. चार-चार पिढ्याने त्या जागेवर हे लोक राहत आहेत.त्या वस्त्यांमध्ये महानगरपालिका सर्व नागरी सुविधा ही पुरवत आहे. मग त्या नागरिकांना पीआर कार्ड का मिळू नये? ज्यामुळे या योजनांचा त्यांना लाभ मिळेल. शहरात रेल्वेची शेकडो एकर जागा आहे. स्वयंवर मंगल कार्यालय ते अण्णाभाऊ साठेनगर या प्रमुख रस्त्यावर रेल्वेच्या जागेवर मोठ्या मोठ्या बाभळीचे जंगल तयार झाले आहे. या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक केल्यास शहरातील नागरिकांना महिलांना सकाळी रस्त्यावर फिरण्याऐवजी रेल्वेच्या मैदानावर फिरता येईल. तसेच सध्याच्या रेल्वे ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज स्टेडियम उभारल्यास राज्य, विभागीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होतील. तसेच रेल्वे स्टेशन ते ग्लोबल गुरुकुल इंग्रजी शाळा हा पाचशे मीटरचा रस्ता जोडला तर गावातून जाणारे सर्व ट्रक हे रेल्वे प्लॅटफॉर्म वरून सरळ बायपास रस्त्याला जातील व वाहतूक सुरळीत होईल.
पुढे अंबेकर म्हणाले की, आपण जरी पराभूत झाला तरी केंद्रात राज्यात तुमची सत्ता आहे. सत्तेत तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक आमदार, खासदार, व शहरातील अभ्यासू नागरिक यांची बैठक घेऊन कुठलाही पक्षभेद न ठेवता हे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी मांडली. त्यास उत्तर देताना माजी
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, येत्या दोन महिन्यात सर्व लोकप्रतिनिधी व शहरातील काही नागरिक यांना सोबत घेऊन एक बैठक घेऊ त्यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे ते म्हणाले. यावेळी भास्करराव दानवे, बाला परदेशी,सुनील खरे, कपिल भुरेवाल, रविकांत जगधने,संतोष माधवले, धनराज कांबलिये यांच्यासह आदीं सर्वपक्षीय पदाधिकारी वनागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन हेमराज भुरेवाल, कचरू भरेवाल, नेमीचंद भुरेवाल, संदीप नाईकवाडे यांनी केले.
००००फोटो ओळी..४-जालना शहरातील हनुमान घाट येथे स्व.बालचंद कन्हैयालाल भुरेवालद्वार या प्रवेशद्वाराचे उद्घाटनप्रसंगी बोलतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार वैâलास गोरंट्याल आदी.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

देवमूर्तीच्या गट नं. 236 मध्ये आकडेवाले फुल; मीटरवाले गुल डीपीचा संपूर्ण खेळखंडोबा;एमएसईबीला निवेदन देऊनही फायदा नाही!

vishwatmaklokswamivarta

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…

vishwatmaklokswamivarta

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta