vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निलंगा ते उदगीर मार्गावर मंजूर बस फेऱ्यासोबत शिवशाही बसच्या जादा फेऱ्या

निलंगा ते उदगीर मार्गावर मंजूर बस फेऱ्यासोबत शिवशाही बसच्या जादा फेऱ्या

लातूर, प्रतिनिधी : निलंगा ते उदगीर या मार्गावर निलंगा आगाराच्या 8 बसेस मंजूर असून संपूर्ण नियमितपणे सुरू आहेत. या बसेसच्या दर अर्धा तासाला एक याप्रमाणे जाणाऱ्या 24 व येणाऱ्या 24 अशा फेऱ्या चालतात. तसेच त्या व्यतिरिक्त या मागार्वार उदगीर-निलंगा-सोलापूर, उदगीर-शहाजनी औराद 2 फेऱ्या, देगलूर-पंढरपूर असे दैनंदिन बसेस चालतात. या व्यतिरिक्त प्रवाशी गर्दी पाहून उदगीर ते निलंगा मार्गावर उदगीर आगारामार्फत शिवशाही बसचे 4 ज्यादा बसेस चालू करण्यात आल्या आहेत. या बसेस स्वच्छ व तांत्रिक दोष नसलेल्या आहेत.

शिवशाही बसेसच्या एकूण 24 फेऱ्या चालत असून त्याचे दैनंदिन किलोमीटर 1 हजार 589 इतके आहेत. शिवशाही बसेसमध्येही ज्येष्ठ नागरिक यांना 50 टक्के, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना 100 टक्के व महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांना 50 टक्के सवलत लागू आहे. या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही जादा बसेस स्वच्छ व तांत्रिक दोष नसल्याबाबतची पडताळणी करुनच मार्गावर पाठविण्यात येत आहेत, असे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

****

संबंधित पोस्ट

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल…

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे