vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात येणार

  • जिल्ह्यात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात येणार

 

बुलडाणा, प्रतिनिधी शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी आढावा सभा नुकतीच पार पडली.

 

येथील केब्रीज स्कूल येथे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षेतखाली आढावा सभा पार पडली. सभेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जयराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. खरात, योजना शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन यांनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या.

 

माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे विभागीय समन्वयक मंगेश भोरसे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत स्वच्छता मॉनीटर टप्पा क्रमांक – 2 मध्ये शाळांची नोंदणी करण्यासंदर्भात कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाचे असामाजिक कृत्य रोखण्याची सवय विद्यार्थ्यांना होण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

अधिव्याख्याता समाधान डुकरे आणि प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी अभियान राबविताना शाळांची नोंदणी आणि येणाऱ्या अडचणींबाबत सादरीकरण केले. सभेसाठी अधिव्याख्याता श्री. गायकवाड, श्री. गवई, श्री. अजगर, श्री. राजुकुमार, संजय दालमिया यांनी पुढाकार घेतला.

 

या अभियानाचा प्रभावी विस्तार होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला -क्रीडा गुणांचा विकास आदी घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे, तसेच महत्वपूर्ण घटकाना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वागीण विकास निश्चितपणे होऊ शकतो. यासाठी सर्व शाळांनी यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर खरात यांनी केले

संबंधित पोस्ट

नागरिकांनी “एक गाव एक गणपती”संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण  वातावरणात उत्सव साजरा करावा” _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड

आदिवासी विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत अयोध्या दर्शनाचे नियोजन-जेष्ठ नागरिकांनी सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लोकसेवेचा आनंद हाच खरा ब्रह्मानंद- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाकौटुंबिक न्यायालय सांगली येथे अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार*109 उमेदवार निवडणूक लढविणार

vishwatmaklokswamivarta