vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाकौटुंबिक न्यायालय सांगली येथे अभिवादन..

महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाकौटुंबिक न्यायालय सांगली येथे अभिवादन..

 

        सांगली, प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी कौटुंबिक न्यायालय सांगली येथे अभिवादन सभा आयोजत केली होती. कौटुंबिक न्यायालयाच्या सामाजिक दीन विशेष मंचावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा. न्यायाधीश सुनीता तिवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना कौटुंबिक न्यायालयाच्या मा. न्यायाधीश सुनीता तिवारी म्हणाल्या, राज्यघटनेचे पाईक म्हणून, घटनेच्या मूलभूत तत्वांचा अंगिकार करून समतेच्या व न्यायाच्या वाटेने संविधानाचे काटेकोर पालन करणे हीच खरी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल. यावेळी राज्यघटनेच्या तत्वांच्या पालनाबाबत न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी स्वरचित प्रतिज्ञा उपस्थितांसह केली.

 या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ फारुक कोतवाल यांनी भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व उपस्थितांनी मौन पाळून आदरांजली वाहिली. कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक ज्योती बावले भालकर, अधिक्षक शैलजा वेदपाठक, कर्मचारी विकास राऊत, संजय लोणकर, महेश खटावकर, श्रुती दुधगावकर, प्रतिभा महाडिक, सुहास धोत्रे, शरद चांडवले, तृप्ती फासे, अंगरक्षक अश्विन सोनकर तसेच वकिलवर्ग व पक्षकार उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

सुशासन सप्ताहात ५३०१ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ-९१ शिबीरांचे आयोजन ; ५८९ तक्रार अर्ज निकाली…

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पर्यावरण संव्हर्धनासाठी संगम प्रतिष्ठाण चा अनोखा उपक्रम गुढीपाडवा चा

जिल्हा कार्यकारी समितीची बैठक-कैद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करा-जिल्हाधिकारी स्वामी

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली**शिवसेना लॉटरी विक्रेता सेना,लॉटरी बचाव कृती समितीची* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडली बैठक*

vishwatmaklokswamivarta