
क्रीडा स्पर्धा मुळे आतंरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात – अड. विजय सावळे,परिवार अर्बन चषक स्पर्धा उत्साहात संपन्न..
राज्य प्रतिनिधी
बुलढाणा:बुलढाणा येथील परिवार अर्बन यांच्या तर्फे व परमवीर क्रिकेट क्लबच्या सहकार्याने शासकीय डी एड कॉलेज च्या मैदानावर क्रिकेट प्रेमीसाठी क्रिकेटचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते. ही स्पर्धा 12 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आली होती.
परिवार अर्बन चषकमध्ये जिल्हा भरातून 32 क्रिकेट उत्कृष्ट संघांनी उत्कृष्ठ सहभाग नोंदविला आहे.30 संघावर मात करत अंतिम सामना हा अगतस्य 11 व एकलव्य क्रिकेट संघ बुलढाणा या संघामध्ये पार पडला. अंतिम सामना च्या लढतीत अगत्स्य 11 या संघाने प्रथम फलदाजी करत एकलव्य क्रिकेट संघ समोर 8 षटाकात 110 धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करतांना एकलव्य संघाकडून प्रसाद फदाट यांच्या फलदाजी च्या जोरावर एकलव्य संघाने 7 षटकातच सामना आपल्या नावावर करत परिवार अर्बन चषक विजेते पद पटकावले आहे.
परिवार अर्बन चषक मध्ये एकलव्य क्रिकेट संघ बुलढाणा विजेते, अगत्स्य 11उपविजेते, सुरज 11 बुलढाणा उत्कृष्ट खेळ या संघासह, ओम साई संघ, पांगरी 11, रोहिनखेड 11, मोताळा भाई स्पोर्ट्स, उदयनगर 11, राजे संभाजी चिखली, भादोला फ्रेंड्स, या संघाने सहभाग नोंदविला होता.
विजेते -उपविजेते व इतर सर्व खेळाडू यांना परिवार अर्बनचे अध्यक्ष राहुल पाटील,परिवार अर्बनचे तज्ञ् संचालक व बार असोसिएशन जिल्हा अध्यक्ष अॅड. विजय सावळे, संचालक शैलेश दादा कुलकर्णी,संचालक मंगल हिवाळे, किशोर हटकर,डॉ गजानन गावंडे, अँड. गजानन नरवाडे, परिवार अर्बनचे कार्यकारी संचालक नितीन कानडजे,अजय जाधव, गजानन खंदारे,विपूल खोटाळे,आयटी प्रमुख प्रशांत इंगळे,उपस्थितत होते..
या वेळी मान्यवर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले प्रसाद फदाट व उत्कृष्ट गेंद बाज अनिकेत परिहार व स्वप्नील पोपळघट यांना सन्मान चिन्ह व रोख स्वरूपातील धनादेश देऊन गौरविण्यात आले.
निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त व सहकार्याची भावना निर्माण होऊन खेळामुळे खेळाडूंचा सर्वांगीन विकास व्हावा या हेतूने परिवार अर्बन चषक स्पर्धा राबवित असल्याचे परिवार अर्बनचे तज्ञ संचालक अड. विजय सावळे यांनी व्यक्त केली..
परम वीर क्लब आयोजित परिवार अर्बन चषक मध्ये श्री ओम साई मार्बल, साई मॉल बुलढाणा, मोरे मॅथमॅटिक्स क्लास, साईराज मेन्स वेअर, शुभम सुरडकर, रोहित मोरे, अमोल देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
[ कचेरी रोड फुलंब्रीकर महाराज यांच्या घरासमोर आज रोजी आयोध्या येथील प्रभू श्री राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा समारंभ निमित्त रामरक्षा स्तोत्र पठण राम नाम जप श्रीरामाची संक्षिप्त संगीत कथा द्वारे श्री रामदास महाराज आचार्य व श्री विनायक महाराज व अशोक पांगारकर व सकल हिंदू समाज यांच्या वतीने आज रोजी कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सर्व भक्तगण उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे



