
दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्यासाठी 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधील,वैयक्तिक अर्थसहाय्य, विविध योजनांचा लाभ घ्यावा.
रायगड, प्रतिनिधी:-“रायगड जिल्हा परिषद, अलिबाग ही दिव्यांगांच्या कल्याणासाठी सातत्याने विविध योजना, उपक्रम राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेने दिव्यांगाना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये चलन वळण अत्यंत सुलभरित्या करता यावे या उदात्त हेतूने अतितीव्र दिव्यांगत्व (60% पेक्षा जास्त) असलेल्या दिव्यांगांसाठी सहाय्यभूत साधने म्हणून (स्कूटी साईड व्हीलसह) पुरविण्याची योजना अर्थसंकल्पामध्ये समाविष्ठ केली असून या योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी तालुक्याच्या गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभाग, समाजकल्याण विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग डॉ.भरत बास्टेवाड, यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत सद्य:स्थितीमध्ये दिव्यांगांना (स्कुटी साईड व्हीलसह) खरेदी करण्यासाठी रक्कम रूपये 1 लक्ष 10 हजार इतके 100 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप, पत्रावळी मशीन, पापड मशिन, झेरॉक्स मशीन, इ. वस्तूंची खरेदीकरण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. हे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. तसेच दिव्यांग अव्यंग व्यक्तींशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे. (दि.01 एप्रिल 2014 नंतरचे विवाहीत जोडपे असणे आवश्यक आहे)
या योजनांसाठी विहित नमुन्यातील अर्ज, रायगड जिल्हयाचा रहिवासी दाखला किंवा रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, ऑनलाईन वैश्विक प्रमाणपत्र UDID Card वैद्यकीय मंडळाकडील किंमान 40 टक्के दिव्यांगत्वाचा दाखला, दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांस प्राधान्य, सक्षम प्राधिका-यांचा उत्पन्नाचा दाखला (अक्षरी 1 लक्ष रूपयेच्या आतील) अथवा कुटुंब दारिद्रय रेषेखालील असल्याचा संबंधित ग्रामसेवकाचा दाखला, मतिमंद व बहुविकलांग पाल्याचा पालकांस लाभासाठी पात्र ठरविण्यात येईल. (पाल्याचा अपंगत्वाचा दाखला सादर करणे अनिवार्य), यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दिव्यांग व्यक्तींस एक वर्षात एकच लाभ देण्यात येतो. बैंक पासबुकची झेरॉक्स प्रत असे एकत्रित सर्वसाधारण निकष आहेत.
00000



