vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते होणार आहे. शुक्रवार, दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील यांनी उपस्थित रहावे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी बेवसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे. मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी दि. 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा 10 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पोषण महिना अभियान रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी सलग तीन वर्ष रायगड जिल्हा राज्यात प्रथम पाच क्रमांकात जिल्हा परिषदेचा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेच्या वतीने दीपक रणनवरे यांचा सत्कारब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

गांधी चमन रेल्वे स्टेशन सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट!चौकशी करून, दोषींवर कारवाई करा नसता आंदोलन- अमरदीप शिंदे

वारणा धरणात 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 5500 क्युसेक्स तर वारणा धरणातून 8530 क्युसेक्स विसर्ग सुरू

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

vishwatmaklokswamivarta

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील गावांमध्ये पर्यटनातून रोजगार व उत्पन्नवाढीसाठी अनेक प्रस्तावांना मान्यता

vishwatmaklokswamivarta