vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महासंस्कृती महोत्सवांतर्गत कार्यक्रमासाठी कलाकारांनी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

महासंस्कृती महोत्सवांतर्गत कार्यक्रमासाठी कलाकारांनी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

 

 

 

सांगली, प्रतिनिधी : महासंस्कृती महोत्सव सन 2023-24 च्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 5 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान 5 दिवस सांगली / मिरज येथे करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवासाठी सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम, प्रदर्शनीय दालने व इतर कार्यक्रमांसाठी इच्छुक संस्था, कलाकार संच / समूह यांच्याकडून 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची निविदा https://sangli.gov.in या वेबसाईटवर दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा समन्वय व संनियंत्रण समितीच्या सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

कार्यक्रमाचे संक्षिप्त स्वरूपात छाननी समितीसमोर सादरीकरण दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता आहे. सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत तर प्रदर्शनीय दालने सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशी कार्यक्रमाची वेळ असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीच्या लेकींकडून “सावित्रीमाई फुले” यांना जयंती निमित्त अभिवादन…

प्रत्येक घरावर फडकवा तिरंगा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे नागरिकांना आवाहन 13 ते 15 ऑगस्ट #हर_घर_तिरंगा अभियान

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन