vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुकांनी 10 जून 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले आहे.

 

महाराष्ट्रातून हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाकरिता बरगढ (ओडिशा) येथे 13 जागा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1 जागा तसेच वेंकटगिरी येथे 2 जागेच्या प्रवेशासाठी तसेच व्दितीय वर्षाकरिता 3 (1 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता) जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर, सोलापूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयांमार्फत 10 जून 2024 पर्यंत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे परिपूर्ण अर्ज 10 जून 2024 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत.

 

उमेदवारांकरिता अधिक माहिती, प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असेही कळविले आहे.

संबंधित पोस्ट

उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादा ठरवून करावे-जिल्हाधिकारी अशोक काकडे

शेतकऱ्यांनी पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत  -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयाकडून  तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

माळशेंद्रा येथील नवयुवकांचा अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करावेत

जिल्हा न्यायालय रायगड व तालुका न्यायालय येथे विशेष मध्यस्थी मोहिमेचे आयोजन