vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

28 मे पर्यंत पदवीधर मतदार नोंदणी  –जिल्हाधिकारी किशन जावळे

28 मे पर्यंत पदवीधर मतदार नोंदणी  –जिल्हाधिकारी किशन जावळे

 

 

 

रायगड, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि.28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारक यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मुदत दि.7 जुलै 2024 रोजी समाप्त होणार आहे. या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

 

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दि. 31 मे, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दि. 7 जून, 2024 (शुक्रवार),नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. 10 जून, 2024 (सोमवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दि. 12 जून 2024 (बुधवार), मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार), मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजता, मतमोजणीचा दि. 1 जुलै 2024 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. 5 जुलै 2024 (शुक्रवार).

 

दि.24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 भरुन सादर करावयाचा आहे.भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि.28 मे, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने करण्याची (de-nova) असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. सदर मतदार यादी ही नव्याने तयार करण्याची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. सदर नमुना नं. 18 हस्तलिखित / टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील.

 

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 पुढील ठिकाणी सादर करता येईल.

 

1) संबंधित तहसिलदार कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा,2) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतील.

 

००००००००

संबंधित पोस्ट

अमृत’ संस्थेची प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजना; जिल्ह्यातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा– विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन, स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य..

नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…

सोलापूर येथील एसटीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, सुदैवाने मोठा अनर्थ टळला, 70-75 प्रवासी बचावले..

दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्यासाठी 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधील,वैयक्तिक अर्थसहाय्य, विविध योजनांचा लाभ घ्यावा.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :खर्च निरीक्षक करणी दान जिल्ह्यात दाखल

vishwatmaklokswamivarta