vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचा दिवाळी सण आनंदात जावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सन 2024 – 25 या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना रू. 34,500/- तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. 28,500/- आणि आशा वर्कर यांना रु. 18,500/- रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.

 यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना रू. 34,500/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

 त्याचप्रमाणे ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना रू. 28,500/- इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

 याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे रू. 28,500/- इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 18,500/- इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

 यासोबतच यावर्षी आरोग्य विभागातील कोविड, नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील घड्याळी तासिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांनाही रू. 18,500/- सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

 अशाप्रकारे एकूण 4961 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या अनुषंगाने दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

 दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा रू. 1500/- इतक्या रक्कमेचे वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून स्वागत करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी  नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६; सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta