vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…

रायगड,( प्रतिनिधी:- केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस बसविण्यची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या जीसएआ 1162 (HSRP) दि. 01.12.2018 व दि. 06.12.2018 नुसार दिनांक 01.04.2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार दि.01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनां HSRP व तिस-या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे याकरीता https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या वेबसाईटवर सर्व वाहनधारकांनी दि.31 मार्च 2025 पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कनण्यात आले आहे.

तसेच दि.01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनां HSRP व तिसऱ्या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या किमान HSRP बवसविणाऱ्या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. सदर जुन्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी परिवहन विभागाने तयार केलेल्या HSRP पोर्टलवर दि.31 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि.01.04.2019 पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी वर नमूद केलेल्या अधिकृत HSRP उत्पादकांकडून वाहनांवर बसविण्यात आलेले HSRP हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले

जाईल. इतर कोणत्याही HSRP निर्मात्याकडून / पुरवठादारकडून बसविलेल्या HSRP मोटार वाहन कायदा आणि नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईसाठी पात्र असतील.००००

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी,नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात …

मान्सूनमधील आपत्तीत एकही मृत्यू होऊ नये- जिल्हाधिकारी सौरभ कटियार*मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा

अनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘आपुलकीचा संवाद’