vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य अभ्यासक्रम आराखडा-2024 मसुद्याबाबत 3 जूनपर्यंत अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

राज्य अभ्यासक्रम आराखडा-2024 मसुद्याबाबत 3 जूनपर्यंत अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

 

 

 

सांगली, प्रतिनिधी : इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आला आहे. हा मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर जनतेच्या प्रतिक्रियांसाठी दि 23 मे पासून खुला करण्यात आला आहे.

 

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक 3 जून 2024 पर्यंत परिषदेच्या https://forms.gle/TDHL९z८harzRgJoy५ या लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल क्रमांक, इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा आदी तपशील देण्यात यावा. अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्द्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, याचा समावेश असावा.

 

तसेच पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्याबर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून पाठवावेत, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ठराव बहुमताने मंजूर होईल- देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनांचेनवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीयनमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीत होणाऱ्याविविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे- मंत्री दीपक केसरकर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली 

vishwatmaklokswamivarta