vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे- मंत्री दीपक केसरकर

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे- मंत्री दीपक केसरकर

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना आज पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 10 वी साठी एकूण 5086 केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 23 हजार 272 शाळांमधून एकूण 16 लाख 09 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती, शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

 

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिमेचे आयोजन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta

बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी..

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta