vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशराजकारण

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

 

राज्य प्रतिनिधी- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…

 मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगेपाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.

धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली, अडीच कोटींची डील झाल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. मी गेली 30 वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जात-पात पाहिली नाही. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्यास सुरुवात केली.

मी  विरोधीपक्षनेते म्हणून काम केले, त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यातील कोपर्डीला मी पहिली भेट दिली, त्यावेळी आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह चालू दिले नाही.

बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणात मी वाटले. मनोज जरांगे यांचे उपोषणही मी सोडले आहे, 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्याच्यावर आरोप केले नाहीत,

असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, मनोज जरांगेना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्लूएसमधून आरक्षण आहे, याचे उत्तर आणखी जरांगे यांनी दिले नाही. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली पद्धत लोक विसरत आहेत, आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घडी पुन्हा बसवायची आहे, असेही धनंजय मुंडेनी म्हटले

याच दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की,

अंतरवालीतून समाजात अंतर पाडले गेले, तुमच्या मेहुण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले गेले, पण माझ्यावर असे काही करायचे संस्कार नाहीत. तुम्ही ओबीसीच घेऊ नका, ईडब्लूएसमधून घ्या. मनोज जरांगेना आता शेतकरी नेता व्हायचं आहे, वंजारी जातीचे बीज ठेवायचे नाही ही धमकी कोणी दिली, मला गोळ्या घाला आणि संपून टाका, फक्त तुम्ही राहा, असा टोलाही जरांगे पाटलांना लगावला. दरम्यान, मी माझ्या वकिलाशी चर्चा करून मानहानीच्या दाव्याबाबत चर्चा करणार आहे, असेही

या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी आहे. माझी ब्रेन मॅपिग, नार्को टेस्ट करा जरांगे आणि आरोपींचीही करा. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांनाही अशा भाषेत बोलायचे ही पद्धत आहे का? असे धनंजय मुंडेंनी म्हटले. आज एआयने सर्व काही करता येते, माझा फोन नेहमी सुरू असतो. कुणाचीही अडचण सोडवण्यासाठी मी फोन सुरू ठेवत असतो. मनोज जरांगे हे तुम्हाला सगळे महागात पडणार आहे, मला ठराविक जातीच्या व्यासपीठावरुन लाथा मारून बाहेर काढले होते, मराठा आरक्षणात 500 जणांचा जीव गेला, हे ईडब्लूएसमधून वाचले असते, असेही मुंडेंनी म्हटले

00000

संबंधित पोस्ट

आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांचा इशारा

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा**एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..