vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मतमोजणी केंद्रावरील व्यवस्थेची जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडून पहाणी

मतमोजणी केंद्रावरील व्यवस्थेची जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडून पहाणी

 

 

 

            सांगली, (जि. मा. का.) : 44 – सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरु असलेले कामकाज व व्यवस्थेची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पहाणी केली.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मत मोजणीच्या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. मत मोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधांबाबत संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.

संबंधित पोस्ट

विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

निवृत्ती वेतन धारकांनी फोन कॉल्स, संदेशापासून सावधानता बाळगावी*जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले रब्बी- उन्हाळी पाण्याचे नियोजन…

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

हिमाचल प्रदेशमध्ये ४८ तासांत दोन पॅराग्लायडरचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta