vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 

 

 

सांगली, प्रतिनिधी : राज्यातील माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

 

या निवडणुकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार, 9 जुलै 2024. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार, 9 जुलै 2024 ते सोमवार, 15 जुलै 2024 पर्यंत आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार, 19 जुलै 2024 असा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे :पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गुन्हेगारीत सहभागी विधी संघर्षित बालकांसाठी दिशा कार्यक्रम…

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

बनावट अन्न व औषध परवाना वापरुन निविदा प्रक्रियेत सहभागासंदर्भात चौकशी समिती गठीत – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 20 जुलेला बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा..

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta