vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत 20 जुलेला बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा..

मुंबईत 20 जुलेला बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा दि.२० जुलै रोजी, सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

२० जुलै, १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर हॉल, परळ, मुंबई या ठिकाणी बैठक घेऊन “बहिष्कृत हितकारिणी सभा” ह्या संस्थेची स्थापना केली. हि संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनातील प्रथम संस्था. ह्या संस्थेच्या स्थापनेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय चळवळीला सुरवात झाली. “बहिष्कृत हितकारिणी सभेच्या” स्थापनेला २० जुलै, २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सवाचे २० जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये छत्रपती शाहू महाराज ह्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे . त्यामुळे

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती व प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज संभाजी राजे छत्रपती हे उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर हे असतील. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आम आदमी पक्षाचे राजेंद्र पाल गौतम, विनोदकुमार तेज्यान, मुस्लिमाचे प्रतिनिधी म्हणून शाहिद सिद्दीकी, ख्रिश्चनाचे जॅक्सन जोसेफ, सुंदर नायडू, पोलीस उपायुक्त भारत शेळके,जगदीश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले,

भारतातील बौद्ध धर्मियांना स्वतःची वेगळी ओळख उभी करताना अनेक अडचणी आहेत. स्वतःची बौद्ध संस्थाने नसल्याने भारतात डॉ. आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म टिकवणे मोठे आव्हान आहे.

जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील मराठा बांधव नेहमीच वंचित आहे. त्याचे प्रतिनिधित्व सगळ्या क्षेत्रात मागे आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांच्या मागण्यांकडे संस्थाने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. राजरत्न म्हणाले.

 

डॉ. आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. मात्र आज संसदेमध्ये आणि विधानसभेत राखीव जागांच्या नावाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी समाजाचे प्रश्न मांडायचे सोडून आपल्या राजकीय पक्षाचे अजेंडे राबवत आहेत, अशी ते काही त्यांनी नाव न घेता काही आंबेडकर पक्षांवर केली.

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणीसाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात- भरारी पथकामार्फत रु.17 लाखांची रोकड जप्त…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta