vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

राज्य प्रतिनिधी- गडचिरोली | पोलीस मुख्यालय-महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला.

या दौऱ्यादरम्यान पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात कसनासूर–बोरीया येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या एकूण 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना शौर्यपदक प्राप्त झाले असून, मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 05 पोलीस उपनिरीक्षकांना गृह विभाग, महाराष्ट्र शासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. या अधिकारी व अंमलदारांचा पदोन्नती समारंभ मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते पार पडला.

यावेळी मा. पोलीस महासंचालकांनी शौर्यपदक व पदोन्नती प्राप्त अधिकारी व अंमलदार तसेच उपस्थित विशेष अभियान पथकातील जवानांशी संवाद साधत माओवादविरोधी अभियानाबाबत सविस्तर चर्चा केली. जवानांच्या अडचणी जाणून घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ते म्हणाले,“गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अधिकारी व जवानांचे बलिदान नेहमी स्मरणात राहील. अवघड परिस्थितीतही मोठे उद्दिष्ट समोर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करावे.”

मा. पोलीस महासंचालकांनी सर्व पदोन्नती व शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून उपस्थित सर्वांचे मनोबल उंचावणारे मार्गदर्शन केले.

000000

संबंधित पोस्ट

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी  अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार वृक्षरोपे

पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

vishwatmaklokswamivarta