vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

27 मराठा शिक्षकांविरुद्ध जिल्हा परिषदेने केलेल्या बेकायदेशीर कारवाईचा निषेध मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व मराठा सामाजिक संघटनांचे 7 फेब्रुवारीला एक दिवसीय लक्षणिक उपोषण..

27 मराठा शिक्षकांविरुद्ध जिल्हा परिषदेने केलेल्या बेकायदेशीर कारवाईचा निषेध

मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व मराठा सामाजिक संघटनांचे 7 फेब्रुवारीला एक दिवसीय लक्षणिक उपोषण..

 

जालना (प्रतिनिधी) ः मराठा शिक्षकांविरुद्ध जिल्हा परिषदेने केलेल्या बेकायदेशीर कारवाईचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व मराठा सामाजिक संघटनांच्या वतीने दि. 07 फेब्रुवारी 2024 रोजी एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा जिल्हा जालना व सर्व मराठा समाज संघटनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जालना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळा नानेगाव ता. बदनापूर येथील ईश्वर गाडेकर या वादग्रस्त शिक्षकाने मराठा आरक्षणा विरोधात आक्षेपहार्य जातीयवादी आणि असंविधानिक भाषेतील पोस्ट फेसबुकवर प्रथमत: पाठविली. सदरील पोस्टला राज्यभरातून विविध समाजातील घटकांनी निषेध नोंदवला सदरील पोस्ट वर राज्यभरातून निषेधाच्या कमेंट झाल्या. याबाबत नानेगाव ग्रामस्थ, तसेच विविध सामाजिक संघटनानी संबंधित ईश्वर गाडेकर या शिक्षिकाविरुद्ध तात्काळ विभागीय चौकशी प्रस्तावित करून निलंबनाची कारवाई करण्याबाबत च्या विविध 30 तक्रारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षण विभाग कार्यालय येथे दखल केल्या आहेत. तसेच, याबाबत मराठा समाजाने यापूर्वी तीन दिवस आमरण उपोषण देखील केले आहे. मात्र, संबंधित शिक्षकाविरुद्ध राजकीय दबावापोटी कसलीही कार्यवाही न करता त्याच्या मराठा आरक्षण विरुद्ध आक्षेपहार्य पोस्ट वर कमेंट करणार्‍या आणि केवळ मराठा जात असणार्‍या 27 शिक्षकांविरुद्ध एका जइउ नेत्यांच्या दबावास बळी पडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी बेकायदेशीर नोटीस बजावून दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी नियमाबाह्य पद्धतीने सुनावणी साठी बोलावले आहे. यात पोस्ट करणार्‍या इतर जातीच्या सर्व लोकांना कुठलीही नोटीस पाठविण्यात आलेली नाही. आपल्याला केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे स्वतः वरील होऊ घातलेली शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी वरील शिक्षकाने याच प्रकारे तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यास देखील जातीयवादी ठरवून रजेवर जाण्यास दबाव आणला आहे. संबंधित शिक्षकाने मोठा आर्थिक व्यवहार करून स्वतःची व स्वतःच्या पत्नीची जालना शहरात सोईस्कर ठिकाणी नियमबाह्य प्रतिनियुक्ती देखील करून घेतली आहे. ज्याबाबत ची मान्यता मा. विभागीय आयुक्तांनी नाकारली आहे. तसेच त्याने आपल्याला वादग्रस्त पोस्ट वर कमेंट केलेल्यापैकी केवळ 27 मराठा शिक्षकांविरुद्ध त्रयस्थामार्फत तक्रारी दाखल करून सदरील नोटिशीचा घाट घातला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या बाजूची प्रामाणिकपणे शहानिशा न करता संबंधित तक्रारखोर शिक्षकावरील नियमानुसार शिस्त भंगाची कारवाई टाळून यापूर्वी कधीही आक्षेप नसणार्‍या प्रामाणिक शिक्षकांना नोटीस बजावून जालना जिल्हा प्रशासन जातीनुसार कारवाई करीत याचे उदाहरण सिद्ध केले आहे. या बाबीचा समाजातील सर्व स्तरातुन तीव्र निषेध व्यक्त होताना दिसत आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चा व सर्व मराठा समाज संघटना यांनी दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषणाचे आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? तुरुंगातून दिलेल्या ‘त्या’ आदेशाची ईडी करणार चौकशी..

vishwatmaklokswamivarta

महाभारतात ‘भीम’ साकारणारे प्रवीण कुमार यांचं निधन, हृदयविकारच्या झटक्याने मालवली प्राणज्योत

vishwatmaklokswamivarta

अल्पवयीन मुलांचे प्रेम आणि रोमँटिक संबंधावर हायकोर्टाची प्रतिक्रिया,पोस्को कायद्याचाही सांगितला अर्थ

बिहारच्या बेगुसरायमध्ये चालत्या ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करताना एक चोर अगदी मरता मरता वाचला आहे.चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचा अभिजीत कटके ठरला हिंद केसरी 2023 चा मानकरी