vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रायगड काव्य कट्ट्यावर आनंदोत्सव साजरा

रायगड काव्य कट्ट्यावर आनंदोत्सव साजरा

 

अलिबाग: प्रतिनिधी– मनातले विचार जेव्हा सुचतात. आणि ते लिखित स्वरूपात येतात. तेव्हा कविता तयार होते ती कधी गेयात्मक होते आणि त्या विचारांनी समाजातील इतर घटकांना आनंद देते व स्वतःलाही आनंद घेता येतो, हीच खरी कविता होय असे विचार रायगडचा युवक फाउंडेशनने आयोजित केलेल्या हिराकोट तलावावरील काव्य कट्ट्याचे उद्घाटन प्रसंगी सातारा येथील कवयित्री, समाजसेविका, प्रगतिशील शेतकरी, भादे पाणीपुरवठा चेअरमन सुनीती धायगुडे यांनी मांडले.यावेळी कवी जयपाल पाटील यांनी. आपल्या प्रास्ताविकात सांगितले की. मी कवी म्हणून लहान मुलांच्या कविता घेऊन. अलिबाग कर. रशियाला गेलो. व कायम कवितांशी बांधिलकी ठेवल्याने. अलिबागच्या माजी नगराध्यक्ष. कैलासवासी नमिता नाईक यांनी सांगितले की. अलिबाग तालुक्यातील नवतरुण तरुणी. ज्येष्ठ कवी. यांच्यासाठी एक कट्टा करा. व दर महिन्याला काव्यत्व साजरा करा. त्यामुळे दर महिन्याला 12 तारखेला काव्य कट्टा. सुरू होता. कोविड 19 मुळे तो बंद झाला होता. पुन्हा अलिबागच्या काव्य रसिकांना आनंद देण्यासाठी. याची पुन्हा सुरुवात केली. असून या. पहिल्या काव्य कट्ट्यासाठी. सातारा येथून प्रगतिशील शेतकरी समाजसेविका. सुनिता धायगुडे. यांचा परिचय अलिबाग कर. कवींना झाला आहे. त्यांनी सादर केलेल्या कवितांचा आस्वाद अलिबाग करानी अनुभवला.या काव्य महोत्सवात. श्री राजेश तळकर अध्यक्ष रायगड जिल्हा म.सा.प. कवयित्री मीनल तवठे, भैरवी जोशी, पूजा पेडणेकर, रश्मी कर्णिक, जयश्री म्हात्रे, सुलभा ठाकूर, तुषार पडवळ, निमिषा म्हात्रे,पद्माकर पवार, प्रा. तांबोळी सर, डाॅ.जयपाल पाटील, सागर पाटील यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी उपस्थित कविनां तांबडकर,रेफ्रिजरेटर चेंढरे,यांनी पाठविलेला चहा घेऊन आलेले कोविड 19 मध्ये उल्लेखनीय कार्य केलेले पद्माकर आंबेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यास फिरोज घंटे व सुरेश खडपे यांनी खूप मेहनत घेतली शेवटी आभार सागर पाटील यांनी मानले-छाया-विकास रणपिसे

संबंधित पोस्ट

८ मार्च महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे बचत महामेळाव्याचे आयोजन – श्री सुरेश बन्सोडे

उष्णतेच्या लाटेमध्ये पिकांचे व्यवस्थापन; कृषि विभागामार्फत उपाययोजना जाहिर…

शिक्षक म्हणजे शैक्षणिक प्रगतीत मोठे योगदान असणार सामाजिक घटक  *- पालकमंत्री शंभूराज देसाई*

पैठण तालुक्यातील शेतरस्त्यांच्या प्रकरणांची दि.७,१५ व २१ रोजी सुनावणी…

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta