
शेतकरी आंदोलना संघटनांची आज देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक…
नवी दिल्ली प्रतिनिधी
वृत्तानुसार, भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत चालणार आहे. शेतकरी देशभरातील प्रमुख रस्ते रोखण्याचा प्रयत्न करतील. पंजाबचे रस्ते चार तास बंद ठेवण्याची योजना आहे. भाजीपाला आणि धान्य खरेदी आणि पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवा बंद केल्या जातील.
शेतकरी आंदोलनामुळे देशातील वातावरण तापले आहे. हरियाणात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन दिवसांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशात आता आता संयुक्त किसान मोर्चा, 10 केंद्रीय कामगार संघटना आदींनी देशव्यापी संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंदच्या या काळात फळे, भाजीपाला आणि दुधाच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये व्यापारी वर्ग सहभागी होणार नाही.
देशभरातील सर्व बाजारपेठा नेहमीप्रमाणे खुल्या राहतील आणि व्यवसाय सुरळीतपणे सुरू राहतील. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने ही माहिती दिली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, भारत बंद दरम्यान व्यापारी लोक त्यांची दुकाने उघडी ठेवतील. जनतेला आवश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल
शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली असली तरी आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आमची दुकाने उघडी ठेवू. या काळात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपल्या सदस्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.



