
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसंदर्भात दि.७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून त्याद्वारे केंद्र शासनाने सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीकरिता जारी केलेल्या सुधारित मार्गसूचना राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत ही योजना राबविण्यात येते. योजनेचा लाभ हा Direct benefit transfer (डीबीटी) द्वारे देण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांच्या अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता आधार क्रमांक असणे व ते त्याच्या बँक खात्यास जोडलेले असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संपूर्णतः विद्यार्थ्यांची असून त्यांनी त्यांचे बँक खाते, दूरध्वनी क्रमांक, आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. प्रतिवर्षाच्या शिष्यवृत्तीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता विद्यार्थ्यांचा मागील वर्षाचा समाधानकारक प्रगती अहवाल व मागील वर्षाची किमान ७५% उपस्थिती असणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज अद्यापही सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत. तसेच या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही करावी व तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना सादर करावे, असे आवाहन श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.¡
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसंदर्भात दि.७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून त्याद्वारे केंद्र शासनाने सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीकरिता जारी केलेल्या सुधारित मार्गसूचना राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत ही योजना राबविण्यात येते. योजनेचा लाभ हा Direct benefit transfer (डीबीटी) द्वारे देण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांच्या अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता आधार क्रमांक असणे व ते त्याच्या बँक खात्यास जोडलेले असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संपूर्णतः विद्यार्थ्यांची असून त्यांनी त्यांचे बँक खाते, दूरध्वनी क्रमांक, आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. प्रतिवर्षाच्या शिष्यवृत्तीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता विद्यार्थ्यांचा मागील वर्षाचा समाधानकारक प्रगती अहवाल व मागील वर्षाची किमान ७५% उपस्थिती असणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज अद्यापही सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत. तसेच या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही करावी व तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना सादर करावे, असे आवाहन श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.



