
अंबड तालुक्यात गाव चलो अभियानाचा प्रारंभ केंद्र सरकारच्या योजनाची घरोघरी जाऊन जनजागृती
———–
अंबड प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध घटकांसाठी सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर माने व समृद्धी शुगर्सच्या संचालिका वैशाली सतीश घाटगे यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कलमध्ये शनिवारी या अभियानास सुरुवात झाली.
भाजापा नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती गाव चलो अभियानातून घराघरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर माने यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील नवीन पिठोरी सिररसगाव येथे विश्वंभर गाडेकर, जगन्नाथ काकडे, गोरख गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भाऊसाहेब खेडकर ,अनिरुद्ध कोळेकर, दीपक कोळेकर ,भागवत गाडेकर यांनी घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती असलेले पत्रक वाटप केले. तसेच नागरिकांमध्ये या योजना विषयी माहिती दिली. तर समृद्धी कारखान्याच्या संचालिका वैशाली सतीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारसवाडा गावात हे अभियान राबविण्यात आले. वैशाली घाटगे यांनी महिलांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजना व घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. या अभियानामुळे मोदी सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहचत आहे. गावकऱ्यांनी या अभियानाचे स्वागत केले तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानले.
[: आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शिरीषजी बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली नगसेवकांचे व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्ठमंडळ म.न.पा आयुक्त जी.श्रीकांत यांना शहरात वाढवलेल्या अवाजवी गुन्ठेवारी कर व मालमत्ता कर रद्द करण्यासाठी भेटले.
औरंगाबाद – येथील म.न.पा च्या वतीने गुन्ठेवारी कर हा दुप्पट वाढवण्यात आलेला आहे. तसेच मालमत्ता कर हा 01 एप्रिल पासुन घरगुती मालमत्तेसाठी 65 % व व्यवसायिक मालमत्तेसाठी 128% ने कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीचे शिष्ठमंडळ मा.आयुक्तांना भेटुन सदर गुन्ठेवारी कर 50% करावा व मालमत्ता कर पुर्वीच्या दराने आकारण्यात यावा असे निवेदन देवुन चर्चा करण्यात आली. त्यामुळे मा.आयुक्त यांनी शिष्ठमंडळाच्या मागणीचा विचार करुन गुन्ठेवारी कर 50 % ने कमी करण्याचे मान्य केले व मालमत्ता कर कमी करण्याचा पुर्नविचार करण्याचे मान्य केले असे श्री. शिरीष बोराळकर, शहर जिल्हा अध्यक्ष भाजपा यांनी सांगितले. यावेळी मा.उपमहापौर श्री. प्रमोद राठोड, मा.नगरसेवीका ॲङ माधुरीताई अदवंत, मा.नगरसेवक श्री दिलीप थोरात, श्री शिवाजी दांडगे, श्री नितिन चित्ते, श्री राजगौरव वानखेडे, श्री सुरेद्र कुलकर्णी, शहर सरचिटणीस श्री. हर्षवर्धन कराड, शहर सरचिटणीस श्री दिपक ढाकणे, शहर सचिव ॲड ताराचंद गायकवाड, श्री. अमित देशपांडे, श्री बंटी चावरिया, श्री संजय फतेलष्कर, श्री अमोल झळके, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष सलीम चिस्ती यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



