vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जागतिक वन्यजीव दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा

जिल्ह्यात जागतिक वन्यजीव दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा

 

 

 

रायगड, प्रतिनिधी- दरवर्षी दि.3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे वन्य प्राणी आणि वनस्पतींचे अनेक सुंदर आणि वैविध्यपूर्ण प्रकार साजरा करण्याची तसेच त्यांच्या संवर्धनामुळे लोकांना मिळणाऱ्या अनेक फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची संधी आहे. त्यानुषंगाने जागतिक वन्यजीव दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

उपवनसंरक्षक, अलिबाग वनविभाग राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग वनविभागात क्षेत्रीय स्तरावर जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने अलिबाग येथे परीक्षेत्र वनअधिकारी अलिबाग व कांदळवन कक्ष अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बामणोली येथे जागतिक वन्यजीव दिन विविध उपक्रमांद्वारे संपन्न झाला.

 

या कार्यक्रमात परिमंडळ वनाधिकारी तीनविरा डॉ.निलेश चांदोरकर, कांदळवन असोशिएट श्रीमती मृणाली डांगे व डॉ.प्रसाद दाभोळकर यांनी वन्यजीव, कांदळवने या विषयावर सादरीकरण केले. तसेच सागरी जैवविधता, वन्यजीव, त्यांचा परस्पर संबंध याची माहिती देण्यात आली.

 

कर्जत पूर्व वनपरिक्षेत्रामधील परिमंडळ धामणी कडील सराई वाडी, ठोंबरेवाडी आणि खानंद या गावामध्ये जाऊन वन्य प्राणी, पशुपक्षी यांच्या विषयी संवर्धन आणि संरक्षणाबाबत माहिती देत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

 

माथेरान वनपरिक्षेत्रातर्फे मधुरम चॅरिटेबल ट्रस्टचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, माणगाववाडी, ता.कर्जत येथे विद्यार्थ्यांना परिसंस्थेतील वन्यजीवांचे महत्व, समस्या व नागरिकांची जबाबदारी या विषयावर संगणकीय सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन तसेच वन्यजीवांची ओळख याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

 

खालापूर वनपरिक्षेत्रातील खोपोली परिमंडळातील वनपाल/वनरक्षक यांनी मौजे लव्हेज नियतक्षेत्रातील लव्हेज (कातकरवाडी) व निगडोली परिमंडळातील मौजे कलोते-रयती नियतक्षेत्रातील कलोते-रयती (ठाकूरवाडी) येथील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करुन वन्यजीवांचे महत्त्व सांगितले व वन्यजीवबाबत मार्गदर्शन केले.

 

वडखळ वनपरिक्षेत्रातील वडखळ व वढाव गावात उपस्थितांना वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करून वन्यजीवांचे महत्त्व सांगितले व वन्यजीवांबाबत मार्गदर्शन केले.

 

नागोठणे वनपरिक्षेत्रातील कडसुरे वन परिमंडळ यांच्या वतीने मौजे कागदा वाडी येथील ग्रामस्थांना वन्यजीवांचे महत्त्व पटवून देऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

 

कर्जत पश्चिम वनपरिक्षेत्रातील किरवली ठाकूरवाडी संयुक्त वन व्यवस्थापन समिती किरवली, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आंबेवाडी व बोरगाव परिमंडळ अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती ओलमन येथील ग्रामस्थांना वन्यजीवांचे महत्त्व या विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सुगवे वनपरिमंडळ अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती काळेवाडी तसेच चीचवडी आदिवासी बांधव यास वन्यजीवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

सुधागड वनपरिक्षेत्रातील ठाणाळे आदिवासी वाडी आदिवासी बांधव व संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य व वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. यावेळी वन्यजीवांचे मानव जीवनामधील महत्व तसेच अवैध शिकार रोखण्यासाठी लोकांचा सहभाग गरजेचा असून मानव-वन्यजीव सहजीवन कसे यशस्वी करता येईल या विषयी चर्चा करण्यात आली.

संबंधित पोस्ट

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मध्यप्रदेश जबलपूर येथील धक्कादायक! दुर्घटना खासगी रुग्णालयात अग्नितांडव, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू…

न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करु नये – अ‍ॅड.मगरे गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही – जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरेदलित, आदीवासी, भुमिहिन कास्तकरांचे अतिक्रमण नियमानूकूलित करुन सातबारा द्या-

vishwatmaklokswamivarta

जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती ऊर्जा निर्मिती करारामुळे 72 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..