vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन,राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करण्याचे केले आवाहन

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन,राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करण्याचे केले आवाहन

 

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावे, असे आवाहन त्यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी श्री. विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसिलदार प्रदीप कुडळ, तहसिलदार श्रीमती उज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले, भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: नामनिर्देशनपत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.

 

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1950

 

लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष 24 तास सुरु आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले.

 

यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री. सत्यवान उबाळे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, स्थानिक निधी लेखा परिक्षा विभागाचे सहाय्यक संचालक दिपक बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

0000000000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिनी 21 जूनला सकाळी 6.30 वा. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कुर्ला येथे ग्राउंड प्लस टू  च्या घराचे भिंत चाळीवर कोसळली, या दुर्घटनेमध्ये १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचेगुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तर चर्मकार विकास संघ निवडणुकीवर बहिष्कार टाकणार…