vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मतदान वाढीसाठी अभिनव उपक्रम . . !

मतदान वाढीसाठी अभिनव उपक्रम . . !

 

 

 

सांगली प्रतिनिधी: तासगाव तालुक्यातील बस्तवडे व यमगरवाडी या मतदान केंद्रांवर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कमी मतदान झाले होते. या ठिकाणी 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत ‘सह्यांची मोहीम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

 

यावेळी मतदारांची प्रतिज्ञा यावर विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ यांच्या सह्या घेण्यात आल्या. ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त मतदारांच्या सह्या आणल्या त्यांना यावेळी विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद शाळा यमगरवाडी येथील विद्यार्थी समर्थ करडे या विद्यार्थ्यांने तब्बल 300 मतदारांच्या सह्या घेतल्याने प्रशालेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला.

 

या उपक्रमांतर्गंत यमगरवाडी येथील एकूण 1 हजार 787 मतदारांनी प्रतिज्ञा पत्रावर सह्या केल्या. असाच उत्स्फूर्त प्रतिसाद बस्तवडे येथील मतदारांनीही दिला. मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी थेट मतदारांपर्यंत पोहोचून राबवलेली ही सह्यांची मोहीम नक्कीच फायदेशीर ठरेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसेल. बस्तवडे व यमगरवाडी या गावांचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा इतकच . . .!

 

000000

संबंधित पोस्ट

पालकांनी अधिकृत मान्यताप्राप्त शाळेतच-आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन

मतदारानों, तुम्‍हीच आहात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार –ना. सुधीर मुनगंटीवार,कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल चंद्रपूर शहाराने अनुभवली ऐतिहासिक गर्दी..

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक संघटना अध्यक्ष, पदाधिकारी मेळावा 13 ऑगस्टला

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा;27 व 28 जानेवारीला घेणार विविध विभागांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न,मान्सूनपुर्व सर्व कामे संबधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ