vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा;27 व 28 जानेवारीला घेणार विविध विभागांचा आढावा

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा;27 व 28 जानेवारीला घेणार विविध विभागांचा आढावा

 

बुलडाणा, प्रतिनिधी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम हे दि. 27 व 28 जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहे. दौऱ्यादरम्यान अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा आढावा घेणार आहे. त्यांच्या दौऱ्यानुसार

 मंगळवार दि. 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता बुलढाणा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा नगरपरिषदेच्या सभागृह हॉलमध्ये बुलढाणा, मलकापूर, शेगाव, खामगाव व चिखली नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांचेसोबत जिल्हा परिषदकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच नागरी दलित वस्ती, रमाई आवास घरकुल योजना, लाड पागे योजनेतील प्रलंबित प्रकरणे, अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जातींसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत तपासणी.

दुपारी 2 वाजता राखीव व दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या अंतर्गत लाड पागे समितीच्या नियुक्ती संदर्भातील सर्व प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन), बुलढाणा यांच्यासोबत लाड पागे समितीच्या प्रलंबित प्रकरणांबाबत बैठक. दुपारी 4 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासोबत तर सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषदचे महिला व बाल विकास अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक, रात्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.

बुधवार, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बुलढाणा नगरपरिषद सभागृह हॉल येथे मेहकर, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मोताळा व संग्रामपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित नगरपरिषदांच्या 5 टक्के निधीचा वापर, आर्थिक दुर्बल घटकांवरील खर्च, नागरी दलित वस्ती, रमाई आवास योजना, लाड पागे योजनेतील प्रलंबित प्रकरणे, अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जातींसाठी प्राप्त निधीबाबत सविस्तर आढावा व तपासणी, दुपारी 2 वाजता राखीव, त्यानंतर सोयीनुसार मुंबईकडे रवाना होतील.

0000

संबंधित पोस्ट

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार…

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची  

मा.आ.कैलास गोरंटयाल आज गुरु गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा

पद्म पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’