vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारावर करता येणार मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारावर करता येणार मतदान

 

 

सातारा प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे. मतदान केंद्रावर त्यांची ओळख पाटविण्यासाठी छायाचित्रासह मतदान ओळखपत्र सादर करावीत. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रे सादर करुन मतदान करु शकतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

 

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तएवेज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष दिव्यांग प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या आधारे मतदारांना लोकसभा-2024 साठी मतदान करता येणार आहे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव आजपासून बुलढाण्यात..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांची तपासणी; मूलभूत सुविधा व सुरक्षा उपायांची पाहणी

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील हरकती व सुचनांवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणीØ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी..

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी सदैव कटिबध्द : सीएस डॉ.भागवत भुसारी-जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आरोग्य शिबीर संपन्न…

भुखंडाचे भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग मध्ये 1 रूपांतरासाठी 24 डिसेंबर रोजी शिबीराचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta