vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी सदैव कटिबध्द : सीएस डॉ.भागवत भुसारी-जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आरोग्य शिबीर संपन्न…

पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी सदैव कटिबध्द : सीएस डॉ.भागवत भुसारी-जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आरोग्य शिबीर संपन्न…

 

राज्य प्रतिनिधी- जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटूंबासाठी पत्रकार भवनात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व आद्य संपादिका तनुबाई बिरजे यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितीत डॉक्टरांविषयी माहिती दिली.पत्रकारांनी धकाधकीच्या जीवनात बातमी करतांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना पत्रकारांना मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी सांगितले की, पत्रकारांसाठी आरोग्याविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. डेंटल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश जतकर यांनी दातांच्या आरोग्याविषयी माहिती देताना सांगितले की, दातांच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते परंतु त्यामुळे एखादा आजार बळावू शकतो. डॉ.सौरभ संचेती म्हणाले की हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ताणतणावामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे काही जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावा. पत्रकारांसाठी संचेती हॉस्पिटल मध्ये निःशुल्क उपचार केले जातील असा आशावाद व्यक्त केला. तर डॉ. रवी शिंदे यांनी पत्रकार हे समाजाचे आरोग्य जप्त असतात पण त्यांचे आरोग्य जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पत्रकार संघाच्या चिन्हांचे मान्यवरा़च्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी, डॉ.राजेश जतकर, डॉ.सौरभ संचेती डॉ.रवी शिंदे, वन मिशन बुलढाणाचे संदीप शेळके, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, विभागीय अधिस्वीकृतीधारक समितीचे सदस्य राजेंद्र काळे यांची मंचावर उपस्थिती होती. शेकडो पत्रकारांनी या शिबिराचा लाभ चेतल. यावेळी शिबरिला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर या शिबिराच्या यशस्वितेसाठी सरचिटणीस कासिम शेख,कार्याध्यक्ष वसिम शेख,प्रदेश प्रीतिनिधी युवराज वाघ, महिला सेलच्या अध्यक्ष मृणाल सावळे,सहसचिव शिवाजी मामलकर‌ यांनी परिश्रम घेतले.शिबिरात पत्रकार सर्वश्री जितेंद्र कायस्थ,राजेश डिडोलकर,संजय जाधव,संदीप शुक्ला, बाबासाहेब जाधव,संजय मोहिते,रवी गणेशे, प्रा.सुभाष लहाने,भानुदास लकडे,प्रेमकुमार राठोड, ब्रह्मानंद जाधव,दिनेश मुडे, पृथ्वीराज चौहान, रविकिरण टाकळकर,पवन सोनारे,संदीप वानखेडे, सुनील मोरे,जाकिर शाह,अजय राजगुरे,रहेमत अली,अजय काकडे,राम हिंगे,इसरार देशमुख, संदीप वंत्रोले,शेख इद्रिस,विलास खंडेराव,आदेश कांडेलकर, शाकिर हुसैन,,सै.इरफान यांच्या सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते

संबंधित पोस्ट

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी,बैठकीत सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता–अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी…

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन