vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यात 26 जून सकाळी 6 वाजेपासून ते 10 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 10 जुलै 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

संबंधित पोस्ट

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

कराड चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम 15 डिसेंबर आधी पूर्ण करा*-पालकमंत्री शंभूराज देसाई*

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 6 जिल्हयातील 13 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस…

vishwatmaklokswamivarta