vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय मंडळनियुक्तीला हायकोर्टात आव्हान; 23 एप्रिल रोजी सुनावनी..

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय मंडळनियुक्तीला हायकोर्टात आव्हान; 23 एप्रिल रोजी सुनावनी..

 

जालना (प्रतिनिधी) ः जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळ नियुक्तीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हान देण्यात आलेले असून या संदर्भातील रिट अर्ज स्विकृत करून खंडपिठाने प्रशासक समितीमधील मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर यांच्यासह एकुन पंधरा प्रशासकांना नोटीसा बजावून येत्या 23 एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या सहकार खात्याने जालना येथील जिल्हा निबंधक अनिल दाबशेडे यांची जालना बाजार समितीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. राज्य शासनाने मागील काही महिन्यांपुर्वी प्रशासकाची नेमणूक रद्द करून त्या ठिकाणी मुख्य प्रशासक म्हणून अर्जुन खोतकर यांच्यासह प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले होते. राज्य शासनाने केलेली ही नेमणूक बेकायदेशीर असल्याचे सांगुन दिलीप रामराव शिंदे यांनी ॲड. अदित्य एन. सिकची यांच्या मार्फत महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना तसेच प्रशासकीय मंडळाविरूध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात रिट याचिका (क्र.3294/2024) दाखल केली होती. त्यांची ही याचिका स्विकृत करून खंडपिठाने मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर, प्रशासक भास्कर दानवे यांच्यासह प्रशासकीय मंडळातील अन्य प्रशासकांना आज दि. 15 एप्रिल 2024 सोमवार रोजी नोटीस बजावली असून सदरहू रिट याचिकेवर येत्या 23 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेल्या प्राथमिक सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे निर्देश खंडपिठाने दिले आहेत.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठीराजकीय पक्षांनी सहकार्य करावे- निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण दि.१६ पासून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यतारद्द होण्याची शक्यता ? विधानसभा निवडणुकीत अपयश…

vishwatmaklokswamivarta

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी ई-पिक पाहणी करावी-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta