vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात स्वीपकडून मतदान जनजागृती कार्यक्रम.

नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात स्वीपकडून मतदान जनजागृती कार्यक्रम.

 

ठाणे प्रतिनिधी- मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करुया, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजावणे हा आपला हक्क आहे असे मतदान जनजागृतीपर आवाहन २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप उपक्रमांतर्गत नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात स्वीप टीम कडून करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती कार्यालयात ५० हून अधिक कर्मचारी उपस्थित होते. या कर्मचारी वर्गाला मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास नौपाडा प्रभाग समितीचे सहा.आयुक्त सोपान भाईक आणि कार्यालयीन अधिक्षक आनंद पाटील आदी उपस्थित होते.

 

सदर मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वा मध्ये पार पडला.

संबंधित पोस्ट

जनतेच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली – कॅप्टन. तमिल सेलवण सायन कोळीवाडा विधानसभा उमेदवार

vishwatmaklokswamivarta

बांधकाम प्रकल्पांचे निरीक्षण ‘आयओटी-एआय’द्वारे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहृन्मुंबई महानगरपालिकेला ‘रिअल-टाईम’ प्रणाली उभारण्याचे निर्देश

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १०६ सदस्यांनी सदस्यपदाची घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

मुरुड येथील आमदार रमेशआप्पा कराड यांच्या जनता दरबारला अभूतपूर्व प्रतिसाद,प्रलंबित समस्यांचा जनता दरबारात नागरिकांनी वाचला पाढा

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

नव्या मुंबईत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त  कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ..

vishwatmaklokswamivarta