vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदानासाठी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी भर पगारी रजा

मतदानासाठी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी भर पगारी रजा

 

रायगड प्रतिनिधी :-33 मावळ लोकसभा मतदारसंघात क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी सोमवार 13 मे 2024 रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

जिल्हातील 33 मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात सोमवार 13 मे रोजी मतदान होणार आहे . या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दिनांक 13 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती/अटीस अधिन राहून देय आहे. 1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. 2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही. 3) सदर आदेशाचे पालन न करणा-या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील. 4) सदरहू आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजना देशभरात सुपरहिट-प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील कार्यक्रमात केले. 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे-२,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात* *- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*

यवतमाळमध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा; 30 लाखांची रोकड, 20 तोळं सोनं लुूबाडलं

चारा लागवडीसाठी शेती मिशनच्या अध्यक्षांचे आवाहन