
कृषी विभागाच्या पुस्तिकेमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी कृषी विभागाने केले आवाहन
ठाणे, प्रतिनिधी
कृषी विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत “भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य,गळीत धान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी” ही पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेमध्ये भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे पेरणीपासून काढणी पर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन या विषयी माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तिकेच्या Draft चा क्यू आर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या मेलवर कळविण्यात याव्यात, असे महाराष्ट्र राज्य, पुणे कृषि आयुक्तालय कृषिसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी कळविले आहे.
0000000000



