vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची घेतली रंगीत तालीम;मंगळवार, दि. 4 जून रोजी सकाळी 8.00 वा होणार मतमोजणीस प्रारंभ

25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची घेतली रंगीत तालीम;मंगळवार, दि. 4 जून रोजी सकाळी 8.00 वा होणार मतमोजणीस प्रारंभ

 

 

 

ठाणे, ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी उद्या, 4 जून 2024 रोजी होणार आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार असून सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून आज या संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली असल्याची ‍ माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी  दिली.

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या रंगीत तालीम दरम्यान 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भुताळे, 146 ओवळा  माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव मस्केपाटील, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, 150 ऐरोली मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी अडकुणे, तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

 

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे.

 

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक (Microbserver)असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर,1 पर्यवेक्षक व 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेच्या मोजणीसाठी देखील स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पासधारक माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

आज झालेल्या रंगीत तालीम दरम्यान मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेची सर्व माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, सोयीसुविधा याचा आढावा  निवडणूक निर्णय अधिकारी  मनिषा जायभाये-धुळे यांनी घेतला.

 

00000000000

 

वृ.क्र.494/2024

संबंधित पोस्ट

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल ट्रेन अचानक रद्द? पनवेल स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा

vishwatmaklokswamivarta

एमसी स्टॅन याच्या गाण्याच शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याता आरोप इंदोर मध्ये बजरंग दलाकडून एमसी स्टॅनला  मारहाण..?  

vishwatmaklokswamivarta

लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या परीक्षांकरिता टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी..

vishwatmaklokswamivarta